मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या हस्ते सत्कार
माजी उपप्राचार्य प्रा. पोकळे यांचे शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव व योगदान मोठे -दादाभाऊ कळमकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी प्रा. अर्जुनराव पोकळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर यांनी सत्कार केला. यावेळी जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, मुख्याध्यापक शिवाजी लंके उपस्थित होते.
दादाभाऊ कळमकर म्हणाले की, माजी उपप्राचार्य प्रा. अर्जुनराव पोकळे यांना उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असून, शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावरील समित्यावर व व्यवस्थापनात भरीव काम केलेले आहे. रयत शिक्षण संस्थेचे श्री गणेश विद्यालय अमळनेर, ता.पाटोदा जिल्हा बीड ही शाखा 1959 साली त्यांचे वडील कै. तात्याभाऊ पोकळे यांच्या प्रयत्नातून,मोठ्या योगदानातून व कर्जतच्या कर्मवीर दादापाटील यांच्या प्रेरणेतून सुरू झाली. कै.तात्याभाऊ पोकळे हे तेव्हापासून ते शेवटपर्यंत स्कूल कमिटी अध्यक्ष होते. त्यानंतर प्रा. अर्जुनराव पोकळे गेली 11 वर्ष स्कूल कमिटी सदस्य असून, रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे गेल्या 8 वर्षापासून सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत.संस्थेच्या माध्यमातून ही शाखा उत्तमरीत्या प्रगतीपथावर आणण्यासाठी अर्जुनराव पोकळे योगदान देत आहे. तसेच श्री अंबिका विद्यालय केडगाव येथील जागेचा प्रश्न सोडविण्यात त्यांचे योगदान राहिले असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. पोकळे यांच्या निवडीबद्दल संस्थेचे विभागीय अध्यक्ष नामदार अशितोष काळे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, मीनाताई जगधने, अरुण पाटील कडू, विभागीय अधिकारी टी.पी. कन्हेरकर, सहा. विभागीय अधिकारी शिवाजीराव तापकीर,मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांनी अभिनंदन केले.