लवकरच दोन माजी नगरसेवकांचा रिपाईत होणार प्रवेश
जातीयवादाला थोपावण्यासाठी आरपीआयच्या माध्यमातून युवकांचे संघटन -सुशांत म्हस्के
अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाच्या माध्यमातून शोषित, पीडिताना न्याय देण्याचे काम केले जात आहे. पक्षामध्ये सर्व जाती-धर्मातील युवक जोडले जात असून, जातीयवादाला थोपावण्यासाठी आरपीआयच्या माध्यमातून युवकांचे संघटन केले जात आहे. तळागाळातील नागरिकांच्या प्रश्नासाठी संघर्ष सुरु आहे. आगामी सर्व निवडणुका रिपाई स्वबळावर लढविणार असल्याचे प्रतिपादन शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षात शहरातील सामाजिक कार्यकर्ते इम्रान शेख यांनी आपल्या युवा कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. यावेळी नवीन कार्यकर्त्यांचा पक्षात स्वागत कार्यक्रमात शहर जिल्हाध्यक्ष म्हस्के बोलत होते. याप्रसंगी शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष गुलाम अली शेख, अल्पसंख्याक जिल्हा संघटक निजाम शेख, संतोष पाडळे, जमीर इनामदार, वैद्यकीय आघाडीचे इम्रान शेख, युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष सचिन शिंदे, ओबीसी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष, विजय शिरसाठ, मोहसीन खान, अभिजित पंडित, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष आजीम खान, जावेद सय्यद, आफताब बागवान, अरबाज शेख, हुसेन चौधरी, सद्दाम पठाण, कार्तिक रोकडे, फैज शेख, किशोर घोडके, संतोष त्रिभुवन, हसन शेख, अबू शेख, हंन्नन शेख, नवाज शेख, सागर राऊत, आजीम शेख, शहेबाज सय्यद, तौसिफ शेख आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे म्हस्के म्हणाले की, शहराच्या प्रत्येक प्रभागनिहाय व गावपातळीवर रिपाईची शाखा उघडून, युवकांना संधी देण्याचे कार्य केले जाणार आहे. पक्षात सर्वच बहुजनांना सामावून घेतले जाणार आहे. दोन माजी नगरसेवक रिपाईच्या संपर्कात असून, ते देखील पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्काराला उत्तर देताना इम्रान शेख म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजाला टार्गेट करण्याचे राजकारण सुरु आहे. जातीयवादी राजकारणाला उत्तर देण्यासाठी रिपाईच्या ध्येय-धोरणनूसार कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.