समता परिषद व ग्रामस्थांच्या वतीने निर्णयाचे स्वागत
अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह निवडणुकांवर शिक्कामोर्तब केल्याने नेप्ती (ता. नगर) गावात समता परिषदेच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी ढोल-ताशाच्या गजरात पेढे वाटून फटाक्यांची आतषबाजीत जल्लोष केला.
गावातील संत सावता महाराज मंदिराच्या प्रांगणात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष रामदास फुले यांच्या नेतृत्वाखाली समता परिषद नेप्ती व निमगाव फाटा शाखेतील सदस्यांनी सर्वोच्च न्यायालयाने जयंतकुमार बांठिया आयोगाचा अहवाल मान्य करुन महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास परवानगी दिलेल्या निर्णयाचे स्वागत करुन जल्लोष करण्यात आला. यावेळी संत सावता महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
यावेळी समता परिषदेचे नगर तालुकाध्यक्ष रामदास फुले, माजी सरपंच अंबादास पुंड, नेप्ती शाखेचे अध्यक्ष शाहूराजे होले, निमगाव फाटा शाखेचे अध्यक्ष हरिभाऊ पुंड, उपसरपंच जालिंदर शिंदे, माजी उपसरपंच शिवाजी होळकर, भानुदास फुले, प्रा. भाऊसाहेब पुंड, सौरभ भुजबळ, राहुल भुजबळ, नितीन शिंदे, सार्थक होले, तेजस नेमाने, मिलिंद होले, रामदास होले, वसंत कदम, सत्तार सय्यद, संतोष चहाळ, जमीर सय्यद, संतोष बेल्हेकर, आकाश वाघमारे, विनायक बेल्हेकर, सुरेश कदम, महेंद्र चौगुले, हर्षल चौरे, रमेश रावळे, धोंडीभामा शेरकर, नानासाहेब बेल्हेकर, राहुल गवारे, नितीन पुंड आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समता परिषदेचे नगर तालुकाध्यक्ष रामदास फुले म्हणाले की, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला मान्यता मिळणे, हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय आहे. या हक्काच्या लढ्यासाठी समता परिषदेने सातत्याने लढा दिला. नुकतेच नेप्ती व निमगाव फाटा येथील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलन केले होते. या राजकीय आरक्षणाने समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणासाठी सातत्याने लढा देणारे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ना. छगन भुजबळ यांचे यावेळी ग्रामस्थांच्या वतेने अभिनंदन करण्यात आले.