माणिक चौक यंग पार्टीचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- माणिक चौक यंग पार्टीच्या वतीने मोहरमनिमित्त डिजेला फाटा देऊन भाविकांना सरबतचे वाटप करण्यात आले. यावेळी यंग पार्टीचे अध्यक्ष नासिर खान, साबीर खान, मोसिन खान, मतीन बेग, रईस शेख, समीर खान, जिशन खान, मारूफ खान, आयान खान, सलमान खान, अजीम शेख, शाहिद वस्ताद आदी उपस्थित होते.
नासिर खान यांनी मोहरम अन्नदान-सरबत वाटप व विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी होण्याची गरज आहे. युवकांनी डिजेला फाटा देऊन पारंपारिक पध्दतीने सण-उत्सव साजरे करण्याचे आवाहन केले.