विद्यार्थ्यांनी केले योगासने
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन प्राथमिक व म. अल्ताफ इब्राहिम माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या प्रांगणात शालेय विद्यार्थ्यांना योगाचे धडे प्रात्यक्षिकासह देण्यात आले. तर निरोगी आरोग्यासाठी योगाचे महत्त्व सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांनी योगाचे विविध आसने केली. यावेळी माध्यमिकचे मुख्यध्यापक जाविद पठाण, प्राथमिकचे मुख्यध्यापक समीउल्लाह शेख, हिना शेख, आयशा शेख, तनाज शेख, सुप्रिया इंगळे, संतोष सुंबे, बाळासाहेब चौधरी, तब्बसुम शेख, अरशिया हवलदार, अंजुम शेख, नर्गिस खान, शब्बीर शेख, एजाज शेख, महेरुन शेख, फरजाना मॅडम, ससे मॅडम, सेवक फैज शेख आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.