लहुजी शक्ती सेनेच्या वतीने सर्व आरोपींना त्वरीत अटक करुन कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी
2 मे रोजी नगर-पुणे महामार्ग बेलवंडी फाटा येथे रास्तारोको
अहमदनगर(प्रतिनिधी)- लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मातंग समाजाच्या तरुणावर औरंगाबाद येथे चोरीच्या संशयावरून हल्ला करुन निर्दयीपणे लाकडी दांडक्याच्या जबर मारहाणीने खून झालेल्या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. तर या घटनेतील सर्व आरोपींना त्वरीत अटक करुन कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष अॅड. हेमंतकुमार खंदारे, प्रदेशाध्यक्ष विद्यार्थी आघाडी, कार्याध्यक्ष राजाराम काळे, जिल्हा संघटक लखन साळवे, जिल्हा संपर्कप्रमुख जयवंत गायकवाड, अभिजीत सकट, अमोल गाडेकर आदी उपस्थित होते.
20 एप्रिल रोजी मनेश आव्हाड (वय 27 वर्षे) या युवकाला किरकोल चोरीच्या संशयावरून लाकडी दांडकेच्या सहाय्याने गंभीर मारहाण करून त्याचा निर्घुण खून करण्यात आला. ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. या घटनेला जवळपास आठ दिवस होत असले तरीही बहुतांश आरोपींना अटक करण्यात आलेली नसून ते फरार आहेत. या प्रकरणाने सर्व समाजाच्या भावना तीव्र असून, यामधील सर्व आरोपींना तात्काळ अटक करुन कठोर कायदेशीर कारवाई करण्याची करण्यात आली आहे. सदर मागणीसाठी 2 मे रोजी नगर-पुणे महामार्ग बेलवंडी फाटा येथे रास्तारोको करण्याचा इशारा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.