ग्रामीण भागातून उत्कृष्ट खेळाडू पुढे येत असून, त्यांना प्रोत्सहानाची गरज – पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयास शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या माजी सैनिक सहादू सुखदेव जाधव याने क्रीडा साहित्य भेट दिले. यावेळी मुख्याध्यापक किसन वाबळे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, सेवानिवृत्त शिक्षक काशीनाथ पळसकर, तुकाराम खळदकर, पप्पू वाबळे, नाना जाधव आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, कोरोनामुळे खेळाडूंचे मोठे नुकसान झाले. दोन वर्षात कोणत्याही खेळाच्या मोठ्या स्पर्धा होऊ शकलेल्या नाहीत. ग्रामीण भागातून विविध खेळातील उत्कृष्ट खेळाडू पुढे येत असून, त्यांना प्रोत्सहानाची गरज आहे. शालेय खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने देण्यात आलेले क्रीडा साहित्याचा उपयोग अनेक खेळाडूंना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शालेय खेळाडूंना डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाचे नेहमीच सहकार्य लाभत असते. संस्थेच्या माध्यमातून डोंगरे यांनी माजी सैनिक जाधव यांच्याकडे खेळाडूंचा प्रश्न मांडला असता, त्यांनी तातडीने क्रीडा साहित्य शाळेसाठी उपलब्ध करुन दिले. या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक वाबळे यांनी त्यांचे आभार मानले.