• Thu. Dec 12th, 2024

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षपदी सारिका लांडगे

ByMirror

Mar 24, 2022

महागाईने जनता होरपळत असताना, शासन व प्रशासनामधील भ्रष्टाचाराने महाराष्ट्र पोखरला जात आहे -रघुनाथ आंबेडकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- महागाईने जनता होरपळत असताना शासन व प्रशासनामधील भ्रष्टाचाराने महाराष्ट्र पोखरला जात आहे. कुंपनच शेत खाऊ लागल्याने सर्वसामान्यांची अवस्था बिकट झाली असून, सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी व भ्रष्टाचारमुक्त समाज घडविण्याकरिता एकजुटीने संघर्ष करुन बदल घडवावा लागणार असल्याचे प्रतिपादन भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशचे पश्‍चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी केले.
भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश (महाराष्ट्र राज्य) संघटनेच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षपदी सारिका लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी आंबेडकर बोलत होते. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्‍चिम महाराष्ट्र सचिव सचिन खैरमोडे यांनी लांडगे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.
भाऊसाहेब कांबळे म्हणाले की, राजकीय नेते, मंत्री व पुढार्‍यांसह त्यांच्या नातेवाईकांचे भ्रष्टाचार राजरोसपणे सुरु असून, सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडून सत्ताधारी व विरोधक एकमेकांचे भ्रष्टाचार उघड करण्यात गुंतले असून, भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी व देशाला वाचविण्यासाठी पुन्हा स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढावी लागणार असल्याचे सांगितले. नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांनी सर्वसामान्यांवर होणारा अन्याय, अत्याचाराचा बिमोड करुन, भ्रष्टाचार रोखण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून कार्य केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडीबद्दल प्रदेश अध्यक्ष कैलाश सातपुते, प्रदेश सरचिटणीस अंबादास शिंदे, सल्लागार अ‍ॅड. अरविंद आंबेडकर, प्रदेश सचिव अमोल चिकणे, संपर्क प्रमुख संतोष कांबळे, बाबासाहेब कांबळे, सतीश अडगुळे, रविंद्र हनवते, महादेव माने आदी प्रदेश कार्यकारणीच्या पदाधिकार्‍यांनी लांडगे यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *