राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन
समतेच्या विचारांचा जागर महात्मा फुलेंनी केला -संजय सपकाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. भिंगार अर्बन बँक येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
जयंती कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, अभिजीत सपकाळ, संभाजी भिंगारदिवे, नाथाजी राऊत, ओबीसी सेलचे अमित खामकर, भिंगार बँकेचे संचालक संदेश झोडगे, माजी नगरसेवक नाना रासकर, दिपक बडदे, सर्वेश सपकाळ, गणेश बोरुडे, मेजर दिलीप ठोकळ, मनोहर दरवडे, सदाशिव मांढरे, अर्जुन बेरड, सुभाष होडगे, विशाल बेलपवार, संपत बेरड, शिवम भंडारी, मच्छिंद्र बेरड, दिपक लिपाणे, मतिन ठाकरे, राधेलाल नकवाल, दिपक धाडगे, शिवाजी बेरड, शरद घाडगे, जनाभाऊ भिंगारदिवे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, चुल व मूल या संकल्पनेला छेद देत महात्मा फुलेंनी महिलांना शिक्षणाची दारे उघडी करुन दिली. मुलींसाठी शाळा काढून स्त्री सक्षमीकरणाचा पाया त्यांनी रोवला. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्यांच्या समतेच्या विचारांचा जागर त्यांनी केला. त्याचे विचार समाजाला प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.