शहरातून शक्तीप्रदर्शन करुन भाकपची रॅली
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा कौन्सिलच्या चोविसाव्या त्रैवार्षिक अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी भांडवलशाही व हुकुमशाही सरकार चले जाव… च्या घोषणा देत हातात लाल झेंडा घेऊन शहरातून रॅली काढण्यात आली. छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करुन या रॅलीची सुरुवात झाली.
महागाई, कामगार विरोधी धोरण, बेरोजगारी आदी प्रश्नांवर रॅलीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यात आल्या. यामध्ये पक्षाचे राज्य सचिव कॉ. तुकाराम भस्मे, राज्य सहसचिव कॉ. अॅड. सुभाष लांडे, जिल्हा सचिव कॉ. अॅड. शांताराम वाळूंज, सहसचिव कॉ. अॅड. सुधीर टोकेकर, महिला फेडरेशनच्या राज्याध्यक्ष कॉ. स्मिता पानसरे, संतोष खोडदे, भारती न्यालपेल्ली, रमेश नागवडे, कॉ. भैरवनाथ वाकळे, कॉ. अॅड. बन्सी सातपुते, कारभारी उगले, भगवान गायकवाड, संजय नांगरे, सतीश पवार, रामदास वागस्कर, निवृत्ती दातीर, सुमन आहेर, दस्त्र हासे, लक्ष्मण नवले, विलास नवले, आर.डी. चौधरी, फिरोज शेख, अरुण थिटे, दिपक शिरसाठ, संतोष गायकवाड, महादेव पालवे, धोंडीभाऊ सातपुते, पांडुरंग शिंदे, महादेव पालवे, संध्या मेढे, कॉ. थोटे, विजय केदारे, नितीन वेताळ, तुषार सोनवणे, दत्ता वडवणीकर, सागर साळवे, वैभव कदम, कॉ. अनंत लोखंडे, रावसाहेब कर्पे, चंद्रकांत माळी, सगुना श्रीमल, शोभा बिमन, संगिता कोंडा, कमलाबाई दोंता, भाऊसाहेब थोटे, लहू लोणकर आदींसह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
रॅली दिल्लीगेट, चौपाटी कारंजा, नालेगाव मार्गे नेप्तीनाका येथील शिवपवन मंगल कार्यालयात समारोप झाला. अधिवेशन स्थळी पक्षाचा ध्वज फडकवून लाल सलामच्या घोषणा देत अधिवेशनाला सुरुवात झाली. दर तीन वर्षांनी भाकप चे राष्ट्रीय महाधिवेशन भरवले जाते. त्यापुर्वी गाव शाखेपासून राज्य शाखेपर्यंत अधिवेशने भरवली जातात. यावेळी महाअधिवेशन दि.14 ते 18 ऑक्टोबर रोजी विजयवाडा आंध्रप्रदेश येथे तर राज्य अधिवेशन दि. 18 ते 20 सप्टेंबर रोजी अमरावती येथे होणार असून, या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिवेशन घेऊन जिल्हा अधिवेशनातून प्रतिनिधी निवडण्यात येणार आहे.