• Thu. Dec 12th, 2024

भाऊसाहेब फिरोदिया, अशोकभाऊ फिरोदिया व रूपीबाई बोरा स्कूलच्या बारावी बोर्डातील गुणवंतांचा गौरव

ByMirror

Jun 11, 2022

कोरोना महामारीच्या बिकट परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश अभिमानास्पद -छायाताई फिरोदिया

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेत अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व रूपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी एचएससी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. तिन्ही शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून, शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संस्थेच्या वतीने पार पडला.


संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी, विश्‍वस्त सुनंदा भालेराव, अ‍ॅड. गौरव मिरीकर, भाऊसाहेब फिरोदियाचे मुख्याध्यापक उल्हास दुगड, अशोकभाऊ फिरोदियाचे मुख्याध्यापक प्रभाकर भाबड, रूपीबाई बोराचे मुख्याध्यापक अजय बारगळ आदींसह शालेय शिक्षक, विद्यार्थी, पालक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


सरस्वती पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात राजेंद्र जाधव यांनी कोरोना वाईट काळ विद्यार्थ्यांनी अनुभवला. आलेल्या संकटावर मात करुन विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. शिक्षकांसाठी ऑनलाईन शिक्षण देताना विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करणे अवघड होते. मात्र शिक्षकांनी देखील उत्तमपणे मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना दिशा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


छायाताई फिरोदिया म्हणाल्य की, कोरोना महामारीत ऑफलाइन ऑनलाइन शिक्षणाच्या गोंधळाने निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. शिक्षक-पालक व विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे हे फळ आहे. बारावीच्या गुणांवर भविष्यकाळ अवलंबून असून, कल्पनेपेक्षा चांगले यश विद्यार्थ्यांनी संपादन केले. विद्यार्थ्यांनी आवड असलेल्या क्षेत्रात आपल्या करिअरच्या दिशेन वाटचाल करण्याचे त्यांनी आवाहन केले.


या गौरव सोहळ्यात पुढील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल विज्ञान शाखा प्रथम- अर्पिता दायमा (90.67) द्वितीय- ऋतुजा कुलकर्णी (87.17), तृतीय- ऋतुजा गर्जे (86.00), चौथा- चिराग कटारिया (85.17), पाचवी- इशा बेंडाळे (82.50), वाणिज्य शाखा प्रथम- यश धाडीवाल (92.50), द्वितीय- तनिषा बोरा (91.67), तृतीय- अमर बापकर (91.50), चौथी- खुशी छेडा (91.17) पाचवी- अदिती टेकाडे (91.00), पूर्वा सोनवणे (आयटीत 100 पैकी 100 गुण).
अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल विज्ञान शाखा- प्रथम- ऋषिका खोसे (86.33), द्वितीय- प्रज्वल गायकवाड (83.83), तृतीय- पावस गावंडे (79.00), चौथी- विजयश्री सुंबे (78.5), पाचवी- गोल्डीकुमारी सिंग (78.33), विषय निहाय प्रथम क्रमांक- विशाल लबडे, गौरी ससे (हिंदी), आकांक्षा सांगळे (मराठी), अर्पिता तेली (बायोलॉजी).
रूपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूल कला शाखा प्रथम- कविता हिरणवाळे (79.50), द्वितीय- शुभम कुंदाडे (73.83), तृतीय- जेबा शेख (72.33), विज्ञान शाखा प्रथम- गौरी ससाणे (71.83), द्वितीय- प्रतिक्षा पवार (71.33), तृतीय- शिरीन सय्यद (70.33).
विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या नावांची घोषणा अश्‍विनी रायजादे यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वैदेही गायकवाड यांनी केले. आभार सोमनाथ नजन यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *