लोकवर्गणीतून साकारणार मंदिर
अहमदनगर (प्रतिनिधी)- बोल्हेगाव येथील महालक्ष्मीनगर परिसरात उभारण्यात येत असलेल्या तुळजाभवानी मंदिराच्या कामाचे भूमीपूजन राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांच्या हस्ते झाले. बाळासाहेब वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव काते, सुधाकर डोंगरे, बाबासाहेब नेटके, दीपक शिंदे, दत्ता जगताप, रज्जाक शेख, सिकंदर शेख, प्रवीण चाबुकस्वार, बाळासाहेब मोरे, जिजाभाऊ जाधव, दीपक जाधव, प्रमोद वाघमारे, अलका वाघमारे, सुरेखा शिंदे, सुशीला दिवटे, पल्लवी काळे, जयश्री वाडेकर, दिलीप फुलारे, लक्ष्मण गायकवाड, नितीन साबळे, विजय क्षीरसागर, संकेत लोखंडे, जिजाबाई साबळे, सुरेश पठारे, सविता पवार, आशाबाई पठारे, गयाबाई माने, बबीता आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
बाळासाहेब वाघमारे म्हणाले की, बोल्हेगावच्या महालक्ष्मीनगर येथे नागरिकांनी लोकवर्गणी करुन तुळजाभवानी मंदिराचे काम सुरु केले आहे. या मंदिरासाठी परिसरातील नागरिक हातभार लावत असून, लवकरच हा भव्य मंदिर उभारणीचे काम पुर्णत्वास जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरेश बनसोडे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून मंदिराच्या कामासाठी निधीची उपलब्धता करून देण्याचे आश्वासन दिले.