प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी होणार वधुवर मेळावा
सामुदायिक विवाह सोहळा घेण्याचा संस्थेचा मानस
अहमदनगर (प्रतिनिधी)- तथागत बुध्दिस्ट सोसायटीच्या वतीने शहरात सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात आलेला बुध्दिस्ट वधू वर सूचक केंद्राच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी निशुल्क वधुवर मेळावा घेण्यात येणार आहे. या वधुवर मेळाव्यासाठी न्यू टिळक रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मध्ये नांव नोंदणी सुरु असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संजय कांबळे व भंत्ते सचितबोधी यांनी केले आहे.
बौद्ध मुला-मुलींना अनुरूप जोडीदार मिळावा व विधुर व घटस्फोटितांचे पुनर्विवाह होण्यासाठी तथागत बुध्दिस्ट सोसायटी संचलित बुध्दिस्ट वधू वर सूचक केंद्र कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक दुर्बल घटकातील मुला-मुलींचे लग्न स्वखर्चाने लावून देण्यात आले आहे. सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करून खर्च वेळ वाचवण्याचा संस्थेचा मानस असून, सेवाभावाने हे कार्य सुरु असून, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी निशुल्क वधुवर मेळावा घेण्याचा संस्थेच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे.
बुध्दिस्ट वधू वर सूचक केंद्राच्या निशुल्क वधुवर मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नांव नोंदणी करण्यासाठी आधारकार्ड, वधू/वराचा एक पासपोर्ट व एक पूर्ण उभा फोटो आणणे आवश्यक आहे. वधुवर मेळाव्यासाठी सत्येंद्र तेलतुंबडे, अॅड. संतोष गायकवाड, दिपक अमृत, प्रकाश कांबळे, किशोर कांबळे, शांताराम बनसोडे, आण्णासाहेब गायकवाड, विशाल कांबळे, मिलिंद आंग्रे, शिवाजी भोसले, रंगनाथ माळवे, संतोष तेलतुंबडे, विजय भोसले, कुलदीप गंगावणे, बलभीम जावळे, विष्णु ठोंबे, आनंद जगताप, अरविंद जगताप आदी परिश्रम घेत आहे.