जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा
अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या राज्य कार्यकारणी बैठकित नगर जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी उपस्थित राहून येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. तर पक्षाचे ध्येय-धोरणावर उपस्थितांनी मार्गदर्शन केले.
बसपाचे राष्ट्रीय महासचिव तथा माजी खासदार डॉ.अशोक सिद्धार्थ यांच्या अध्यक्षतेखाली चेंबूर (मुंबई) येथील बीएसपी भवनात झालेल्या बैठकीसाठी प्रदेश प्रभारी नितीन जाटव, प्रदेश प्रभारी प्रमोद रैना, प्रदेश अध्यक्ष अॅड.संदीप ताजने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ.अशोक सिद्धार्थ यांनी जातीयवादी व भ्रष्टाचारी पक्षांना बसपा सक्षम पर्याय आहे. पक्षाचे विचार व ध्येय-धोरण जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्याचे काम कार्यकर्त्यांना करावे लागणार आहे. सर्वजन हिताय, या भावनेने सर्वांनी योगदान देऊन वंचितांचे प्रश्न सोडवण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी सेक्टर प्रभारी प्रशांत इंगळे, अॅड. सुनील डोंगरे, मनीष कावळे, प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार, प्रदेश सचिव बाळासाहेब आवारे यांच्यासह प्रमुख पदाधिकार्यांनी आपले विचार मांडले.
या बैठकीसाठी अहमदनगर जिल्हाध्यक्ष जितेंद्र साठे, जिल्हा महासचिव मेजर राजू शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश आहिरे, जिल्हा कमीटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी आपल्या कार्याचा आढावा प्रदेशच्या बैठकित सादर केला. प्रदेश सचिव बाळासाहेब आवारे यांनी नगर जिल्ह्यात 20 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय बैठक घेण्याचे सुचित केले. या बैठकिसाठी राज्याचे पदाधिकारी उपस्थित राहून पदाधिकार्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले. या बैठकिसाठी जिल्ह्यातील सर्व विधानसभा कमिटी व सेक्टर बुथ कमीटी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा महासचिव मेजर राजू शिंदे यांनी केले आहे.