डॉ. बापू चंदनशिवे जिल्हाध्यक्षपदी तर रामदास वागस्कर यांची सचिवपदी नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतेच अहमदनगरमध्ये प्रगतिशील लेखक संघाचे जिल्हा अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात प्रगतिशील लेखक संघाची अहमदनगर जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. प्रगतिशील लेखक संघाचे राज्य सरचिटणीस व प्रसिध्द कादंबरीकार राकेश वानखेडे यांनी ही कार्यकारणीची निवड केली. यामध्ये डॉ. बापू चंदनशिवे यांची प्रगतिशील लेखक संघाच्य जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्ष म्हणून नीलिमा बंडेलू, उपाध्यक्षपदी प्रसिद्ध हिंदी व उर्दू गझलकार डा. कमर सुरूर, कवयित्री शर्मिला गोसावी यांची निवड करण्यात आली. सचिवपदी रामदास वागस्कर यांची तर सहसचिव पदी डॉ. गणेश विधाटे व श्रीरामपूर येथील धनंजय कानगुडे यांची निवड करण्यात आली आहे.
याबरोबरच कोषाध्यक्षपदी तानाजी साळवे व रामदास घुटे यांची निवड करण्यात आली. सदस्यपदी सोमनाथ केंजळे, आनंद गोलवड, संध्या मेढे व आकाश दौंडे, डॉ. अनंत केदारे, रोहित गायकवाड, यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे राकेश वानखेडे यांनी सांगितले. सल्लागार म्हणून कॉ. स्मिता पानसरे, प्रसिद्ध कवी संतोष पद्माकर पवार, संगमनेर येथील के. जी. भालेराव व डॉ. महेबूब सय्यद यांची नियुक्ती झाली आहे.