• Mon. Dec 9th, 2024

पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये भरले बालवैज्ञानिकांचे प्रदर्शन

ByMirror

Mar 2, 2022

पर्यावरण संवर्धन, जल शुध्दीकरण, पाणी बचत, सौर ऊर्जा प्रकल्पाने वेधले लक्ष

अहमदनगर (प्रतिनिधी)- पोदार इंटरनॅशल स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. शाळेत विज्ञान प्रदर्शन व विज्ञान या विषयावर प्रश्‍नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन, जल शुध्दीकरण, पाणी बचत, सौर ऊर्जेचा वापर आदी विविध विषयांवर दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रकल्प तयार केली होती.
या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता पहिली ते नऊवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. विज्ञान प्रदर्शनासाठी शाळेतील विज्ञान शिक्षिका नलिनी काटरपवार, डायना सत्राळकर, पूनम जाधव, शुभांगी यादव, दृष्टी अलरेजा यांनी विद्यार्थ्यांना उपकरणे तयार करण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले.
शाळेचे प्राचार्य मंगेश जगताप म्हणाले की, नवनवीन प्रयोगाने चिकित्सक वृत्ती वाढीस लागते. विज्ञानाची कास धरल्यास त्यातून प्रगती होणार आहे, त्याबरोबर भविष्यातील नवनवीन प्रयोग करण्यासाठी प्रेरणा मिळेल. विद्यार्थ्यांच्या बुद्धीला व कलागुणांना चालना देण्यासाठीच हे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना निर्बंधामुळे मागील दोन वर्षापासून शाळेत विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले नव्हते. यावर्षी विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षनीय होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डायना सत्राळकर यांनी केले. आभार सुरेश शेळके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *