• Wed. Dec 11th, 2024

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची राष्ट्रवादीच्या वतीने जयंती साजरी

ByMirror

May 31, 2022

जनतेसाठी असलेले अहिल्यादेवी होळकर यांचे कल्याणकारी राज्याचे कार्य व विचार प्रेरणादायी -प्रा. माणिक विधाते

अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील अनिष्ट प्रथा, रुढी व परंपरेला छेद देत अहिल्यादेवी होळकर यांनी कल्याणकारी राज्याची निर्मिती केली. स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्त्या म्हणून त्या पुढे आल्या. जनतेचे प्रश्‍न सोडविण्यास त्यांनी प्राधान्य दिले. जनतेसाठी कल्याणकारी राज्य करताना त्यांनी मंदीरे व नदीघाट बांधले. अनेक मंदिराचा जीर्णोध्दार केला. जनतेसाठी असलेले त्यांचे कल्याणकारी राज्याचे कार्य व विचार प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी व्यक्त केला.


अहमदनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. विधाते बोलत होते. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या अभिवादन कार्यक्रमासाठी स्वप्निल ढवण, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष निलेश बांगरे, अल्पसंख्यांक सेलचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, दादासाहेब दरेकर, युवक जिल्हा उपाध्यक्ष संतोष ढाकणे, इसळकचे उपसरपंच अमोल शिंदे, अर्बन सेलचे प्रा. अरविंद शिंदे, ओबीसी सेलचे अमित खामकर, विशाल म्हस्के, सरचिटणीस गणेश बोरुडे, लहू कराळे, सारंग पंधाडे, मयुर भापकर, अक्षय भिंगारदिवे, पवन कुमठकर, वैभव म्हस्के, निलेश सुपेकर, संदीप सायंबर, अजय शेडाळे, शेखर पंचमुख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे बोलताना प्रा. विधाते यांनी समाज हितासाठी बदल घडविण्यात अहिल्यादेवी होळकरांचे मोठे योगदान आहे. अनिष्ट रुढी परंपरांना फाटा देऊन त्यांनी महिलांना सन्मानाची वागणुक मिळण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *