अहमदनगर (प्रतिनिधी)- पिपंरी जलसेन (ता. पारनेर) येथील उदयराव शेळके यांचे अधिपत्याखाली असणारी श्री रोकडोबा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक लहु भागुजी थोरात यांची एकमताने निवड करण्यात आली.
तर व्हाईस चेअरमनपदी आदर्श शेतकरी विठ्ठल यादव अडसरे यांची निवड झाली. संस्थेच्या पदाधिकारी निवडप्रसंगी पारनेर तालुका सहाय्यक निबंधक गणेश औटी, सहायक अधिकारी उमाप, भोसले, वाघमोडे, मयुर रोहकले, सरपंच सुरेश काळे, संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते. उपस्थितांनी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदयराव शेळके व आमदार निलेश लंके यांनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले.