नेवासा न्यायालयाचा निर्णय
अहमदनगर (प्रतिनिधी)- अजित वाळेकर (रा. नेवासा) यांनी कौटुंबिक कलहातून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु 9 मे रोजी शहरातील एका खासगी हॉस्पिटल अहमदनगर मध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सदर मयताने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून नातेवाईकांना व्हाट्सअपद्वारे पाठविली होती. या सुसाईड नोटमध्ये मयतच्या पत्नीसह इतर सात व्यक्तींची नांवे होती.
या घटनेवरुन मयत अजित वाळेकर यांच्या आईने 18 मे रोजी सोनई पोलीस स्टेशन येथे मयताची पत्नी व तिच्या नातेवाईकाविरुध्द विरुद्ध 306 कलमानुसार फिर्याद दाखल केली. सदर प्रकरणात आरोपींच्या वतीने अॅड. सत्यजीत कराळे पाटील, अॅड. शिवाजी कराळे पाटील व अॅड. करुणा शिंदे यांच्या मार्फत नेवासा जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायाधीश यांच्या समोर अटकपूर्व जामीन अर्ज ठेवण्यात आला होता. अॅड. कराळे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन या प्रकरणात न्यायालयाने आरोपी अजिनाथ मैंद, संगीता मैंद, वैजिनाथ मैंद, श्रीनाथ मैंद, किर्ती मैंद व तुषार भातांबरे यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीनावर सुटका केली आहे.