यावर्षी ग्लोबल वॉर्मिंगच्या जनजागृतीसाठी देखाव्याचे आयोजन
गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक विषय हाताळावे -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पटवर्धन चौक प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या श्री गणेशाची आरती सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी महादेव हरबा, बाळासाहेब खताडे, पटवर्धन चौक प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष मनोज गायकवाड, सचिव आकाश वाळके, संभाजी गिरे, राजू औटी, भोपे गुरुजी आदींसह मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
पटवर्धन चौक प्रतिष्ठान ट्रस्ट या वर्षी ग्लोबल वॉर्मिंगच्या जनजागृतीसाठी देखावा सादर करणार आहे. वातावरणात झपाट्याने होणारे बदल व यामुळे सजीव सृष्टीवर होत असलेले दुष्परिणाम दर्शवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाणार असल्याचे अध्यक्ष मनोज गायकवाड यांनी सांगितले. पै. नाना डोंगरे म्हणाले की, सर्व समाजबांधवांना एकत्र आणण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहुर्तमेढ रोवली. गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक विषय हाताळून समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे त्यांनी सांगितले.