• Wed. Dec 11th, 2024

निमगाव वाघात वृक्ष दिंडीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

ByMirror

Aug 17, 2022

हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा लावली झाडे

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सामाजिक वनीकरणचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडी काढून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. झाडे लाव, झाडे जगवा…, पर्यावरण वाचवा…, एक मुल एक झाड… घोषणांनी गाव परिसर दुमदुमला.


सामाजिक वनीकरणच्या वतीने या वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नवनाथ विद्यालयातील हरित सेनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. वृक्ष दिंडीत मार्गक्रमण करताना ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली. या उपक्रमात नवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक किसन वाबळे, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, वनरक्षक अधिकारी अफसर पठाण, निळकंठ वाघमारे, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, मंदा साळवे, तेजस केदारी, संतोष रोहकले, नवनाथ जाधव, काशीनाथ डोंगरे, बळवंत खळदकर आदींसह शालेय शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, पर्यावरणाचे प्रश्‍न गंभीर बनत असताना प्रत्येक नागरिकाने सामाजिक उत्तरदायित्व या भावनेने वृक्षरोपण व संवर्धन या अभियानात योगदान देण्याची गरज आहे. पुढील पिढीच्या भवितव्यासाठी आपल्या मुलांप्रमाणे झाडे लाऊन ती वाढविण्याची गरज आहे. शाळेत लहान मुलांना पर्यावरणाचे महत्त्व समजवून वृक्षरोपण चळवळीचे संस्कार रुजवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या वृक्ष दिंडीच्या समारोपानंतर शाळेत विविध कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा पार पडल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *