शहर व उपनगरात रंगल्या बॅडमिंटन, अॅथलेटिक्स, क्रिकेट व फुटबॉल स्पर्धा
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात आयोजित करण्यात आलेल्या नगर वेल्थ गेम्स संग्राम चषकला शहरातील खेळाडूंचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. कोरोनामुळे दोन वर्ष मैदानी खेळाच्या स्पर्धा होऊ न शकल्याने या चषक अंतर्गत घेण्यात आलेल्या बॅडमिंटन, अॅथलेटिक्स, क्रिकेट व फुटबॉल स्पर्धेत खेळाडूंचा उत्साह पाहण्यास मिळाला.
आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगर वेल्थ गेम्स संग्राम चषकाचे आयोजन करण्यात आले होते. नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये तब्बल आठशे ते हजार खेळाडूंनी सहभाग नोंदवला. वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे बॅडमिंटन, अॅथलेटिक्स, सावेडी येथे क्रिकेट तर तपोवन रोड येथे फुटबॉल स्पर्धा पार पडले असल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक इंजि. केतन क्षीरसागर यांनी दिली.
या स्पर्धेसाठी जे.एम.आर. इन्फ्रास्ट्रक्चर, रॉस्क बिल्डकॉन, रामकृष्ण इंजीनियरिंग कन्सल्टंट, अहमदनगर डिस्ट्रिक्ट अॅथलेटिक्स असोसिएशन, बॅटल डोअर स्पोर्टस अकॅडमी, फ्रेंडस स्पोर्टस अकॅडमी यांचे सहकार्य लाभले.