प्रहार दिव्यांग क्रांतीचे राजेंद्र गोरे यांनी जपली सामाजिक बांधिलकी
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र गोरे यांनी आपल्या आईच्या वर्ष श्राध्दनिमित्त दिव्यांग जोडप्यांना नवीन कपड्यांचे वाटप करुन तसेच अनाथालय व शाळेला आर्थिक मदत दिली. सामाजिक जाणीव ठेऊन दिव्यांगांसाठी कार्य करणारे राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविण्यात आला.
राजेंद्र गोरे यांच्या आईचे मागील वर्षी कोरोनाने निधन झाले. त्यानंतर तीनच दिवसात त्यांच्या बंधूचे निधन झाले. ते स्वतः कोरोना पॉजिटिव्ह असताना वाचले. वंचित घटकांची सेवा करण्याच्या आईने केलेल्या संस्काराने त्यांनी हा उपक्रम मिरजगाव (ता. कर्जत) येथे राबविला. यावेळी दहा अंध जोडप्यांना नवीन कपडे व साड्या देण्यात आले. स्नेहप्रेम अनाथालयास एकवीसशे व दादा पाटील महाविद्यालयात एकतीस हजार रुपयांची देणगी दिली. प्रबोधनकार दयानंद महाराज कोरेगावकर यांनी देव हा माणसात आहे, मंदिरात भक्ती तर मनुष्यात देव शोधल्यास जीवनाचे सार्थक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष अॅड. लक्ष्मण पोकळे, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, प्रा. संजय घोडके, सामाजिक कार्यकर्ते संदीप केदारी, बाळासाहेब गाडे, कैलास जगताप, शंकर नेवसे, सदाबापू शिंदे, संदीप कारंजकर, पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत बुद्धिवंत, अमृत लिंगडे, सरपंच नितीन खेतमाळीस, प्रकाश चेडे, सोनी गुलाटी, सुदाम जवणे, चक्रधर ससाणे, राजाराम चिपाडे, स्नेहप्रेमचे फारुक बेग आदी उपस्थित होते.