वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी व पोलीसांशी सहकार्याची भूमिका ठेऊन कार्य करणार -प्रा. लोखंडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- वंचित व दुर्बल घटकातील नागरिक आणि पोलीस यांच्यातील दुवा म्हणून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य दक्ष नागरिक फाऊंडेशनच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रा. पंकज लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे केंद्रीय महासचिव सुरेश भामकर (नागपूर) यांच्या सुचनेनूसार प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब सणस यांनी प्रा. लोखंडे यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
सामाजिक कार्यकर्ते प्रा. पंकज लोखंडे विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य व पर्यावरणाशी निगडीत कार्य करत आहे. वंचित व दुर्बल घटकातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे कार्य सुरु असून, अन्याय, अत्याचाराचा बिमोड करण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नाशिक विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
जनतेला कर्तव्य व अधिकाराची जाणीव करुन देणे, भयमुक्त समाजाची निर्मिती, सामाजिक कार्य व पोलीस यांच्यात विश्वासाचे नाते जोडणे, समाजात कायदा सुव्यवस्था राहण्यासाठी पोलीसांना सहकार्य करण्याचे संघटनेचे प्रमुख उद्देश आहे. या उद्देशाने नाशिक विभागात वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी व पोलीसांना नेहमीच सहकार्याची भूमिका ठेऊन कार्य करणार असल्याची भावना प्रा. लोखंडे यांनी व्यक्त केली.
या निवडीबद्दल त्यांचे फाऊंडेशनच्या महिला आघाडी राज्य अध्यक्षा सुनीता पाटणे, राज्य कायदेशीर सल्लागार अॅड. संजय पवार, शिक्षण विभाग राज्य अध्यक्षा नीलिमा भिंताडे, कार्यालयीन प्रमुख अमोल गायकवाड, माजी सरकारी वकील अॅड. संजय पवार, नगरचे सामाजिक कार्यकर्ते मोहन ठोंबे, जितेंद्र ठोंबे, रमेश आल्हाट, युसूफ शेख, विजय जाधव, विजय दुबे, चंद्रमनी घायतडक, सोन्याबापू भाकरे, प्रशांत लोखंडे, भिमराज सरोदे, उदय खळेकर, अण्णा धोत्रे, शारदा साळवे, नितीन साठे, गोरख पवार, जावेद सय्यद, अमित लोखंडे, मोहित निकाळे, रोहित निकाळे, जॉनसन लोखंडे, अक्षता साठे, प्रांजली लोखंडे, आदेश जाधव, राजरत्न लोखंडे, धिरज जाधव यांनी अभिनंदन केले आहे