• Wed. Dec 11th, 2024

तारकपूर येथील गुरुद्वाराचे कर माफ करुन दिल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार

ByMirror

Jun 3, 2022

शीख, पंजाबी समाजात असलेला सेवाभाव प्रेरणादायी -आ. संग्राम जगताप


अहमदनगर (प्रतिनिधी)- तारकपूर येथील गुरुद्वारा बाबा श्रीचंदजी या धार्मिक स्थळाचे मालमत्ताकर महापालिकेस पाठपुरावा करुन माफ करुन दिल्याबद्दल शीख, पंजाबी समाजाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार करण्यात आला. आमदार जगताप यांनी तारकपूर येथील बाबा श्रीचंदजी गुरुद्वाराला भेट देऊन महापालिकेच्या कर माफीचे पत्र समाजबांधवांना दिले.


तसेच यावेळी स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे व माजी सभापती अविनाश घुले यांचा सत्कार करुन आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे यांचे विशेष आभार मानण्यात आले. यावेळी वीराजी वाही, अमित थापर, जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, राजेंद्र कंत्रोड, सतीश गंभीर, प्रितपालसिंह धुप्पड, प्रदीप पंजाबी, अवतार गुरलीजी, चरनजितसिंह गंभीर, जय रंगलानी, कैलाश नवलानी, रामसिंह कथुरिया, संजय आहुजा, राजू जग्गी, किशोर कंत्रोड, लखु मटलाई, प्रेमा खंडुजा, अनिता खन्ना, सौ. गंभीर आदी उपस्थित होते.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, टाळेबंदीत शीख, पंजाबी समाजाची लंगर सेवा सर्वसामान्यांसाठी आधार ठरली. शहरात कोणताही नागरिक उपाशी राहिला नाही. या समाजात असलेला सेवाभाव प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
तारकपूर येथे बाबा श्रीचंदजी गुरुद्वारा असून, येथे शीख, पंजाबी समाजाचे विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. महापालिकेकडून गुरुद्वाराला सर्वसामान्य कराप्रमाणे कर लावण्यात आलेले होते. सदर वास्तू धार्मिक स्थळ असल्याने इतर करातून सुट मिळण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात आला होता. याची दखल घेऊन महापालिकेने धार्मिक स्थळाप्रमाणे सदर गुरुद्वार्‍याचे इतर सर्व सामान्यकर माफ केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *