दहावीत वेदांत सोनी तर बारावीत अर्णव पाटील विद्यालयात प्रथम
इंग्रजी, गणित, विज्ञान तसेच जीवशास्त्र व रसायनशास्त्रात विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण
अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने घेण्यात आलेल्या दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत तक्षिला स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. कोरोनामुळे दोन टर्म मध्ये झालेल्या परीक्षेच्या बिकट परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले असून, दहावी मध्ये वेदांत सोनी (97.4 टक्के) तर बारावी मध्ये अर्णव पाटील (96.6 टक्के) विद्यालयाच्या गुणवत्ता यादीत प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.
संस्थेचे संचालक शांताराम हेगडेकट्टे व प्राचार्य जयश्री मेहेत्रे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेत इयत्ता दहावी मध्ये प्रथम- वेदांत सोनी (97.4), द्वितीय- समृद्धी राऊत (96.8), तृतीय- स्पंदन पठारे (95.2)
तसेच इयत्ता बारावीत प्रथम- अर्णव प्रभास पाटील (96.6), द्वितीय- श्रेया खानकर (95.2), तृतीय- ज्ञानदा तरडे (93.2) येण्याचा मान मिळवला आहे.
इयत्ता दहावी मधील समृद्धी राऊतने इंग्रजी विषयात, वेदांत सोनी व ओम पवार यांनी गणित मध्ये, तर वेदांत सोनी याने विज्ञान विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवले. इयत्ता बारावीतील अर्णव पाटीलने जीवशास्त्र, श्रेया खानकरने रसायनशास्त्र विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवले.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना समन्वयक तन्वीर खान, ओमकार बिष्ट, मुबिना शेख, अश्विनी नन्नवरे, नीरज वोहरा, बाळासाहेब लिमकर, श्वेता शिरसाठ, कल्पना गवारे, प्रज्ञा क्षीरसागर, सुनंदा पाटील, प्रियंका सिंग या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.