आंबेडकरी समाज व संघटनांचा मार्केटयार्ड चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर बैठा सत्याग्रह
पुतळ्या शेजारील अतिक्रमण हटविण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- मार्केटयार्ड येथील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी असलेले अतिक्रमण हटवून पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी गुरुवारी (दि.24 फेब्रुवारी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा संघर्ष समितीच्या माध्यमातून फुले, शाहू, आंबेडकरी विचारांना मानणारे समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने बैठा सत्याग्रह करण्यात आला. या आंदोलनात सहभागी झालेल्यासर्व भीमसैनिक व भिम अनुयायी यांनी जोरदार निदर्शने केली. पुर्णाकृती पुतळ्यासाठी आंबेडकरी चळवळीतील सर्व अनुयायी आग्रही आहेत.