नागरिकांनी केला नेत्रदानाचा संकल्प
केडगाव जागरूक नागरिक मंचचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव जागरूक नागरिक मंचच्या वतीने जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. स्वास्तिक हॉस्पिटल व वैष्णवी ऑप्टिकल्सच्या सहकार्याने नेत्ररोग चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
केडगाव येथील बागले हॉस्पिटल मध्ये शिबीराचे उद्घाटन डॉ. माधव भोर यांच्या हस्ते झाले. शिबीराला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. डॉ. प्रफुल्ल चौधरी, वैष्णवी जरबंडी, ओमकेश कोंडा यांनी रुग्णांची तपासणी केली. शिबीरातील 31 नागरिकांनी नेत्रदान संकल्पपत्र भरून नेत्रदानाचा संकल्प केला.
मंचचे अध्यक्ष विशाल पाचारणे म्हणाले की, देशात अनेक दृष्टीहीन लोक डोळ्यांच्या प्रतिक्षेत आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन व्यक्तींच्या जीवनात प्रकाश निर्माण होणार आहे. शरीर हे नष्वर असून, मरणोत्तर नेत्रदानाने अनेकांचे अंधकारमय जीवन प्रकाशमय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. माधव भोर यांनी नेत्रदान चळवळीच्या जनजागृतीसाठी व नेत्रदोष असलेल्या गरजू घटकांसाठी हे शिबीर कौतुकास्पद असल्याचे सांगितले. यावेळी वैभव कदम, प्रविण पाटसकर, स्नेहलता बागले, सुभाष बागले, उस्मान गनी मनियार, ठकुबाई कोतकर, भागिनाथ पंचमुख, परवेज शेख, बी.के. पठारे, सुमन डोंगरे, हिराबाई मासाळ, वैशाली वाघमोडे, शालन पवार, लता गवळी, किशोर धनगर, दत्तात्रेय मेहेत्रे, अशोक पवार, जयश्री गायकवाड, मेहरूनिस्सा शेख, आशा पाचारणे, गणेश चौधरी, महादेव शिंदे, वैशाली शिंदे, संतोष शिंदे, मेघा पाटसकर, अश्विनी पाचारणे, नॅशनल पोस्टल कर्मचारीचे अध्यक्ष संतोष यादव, डॉ. गिरीश दळवी आदी उपस्थित होते. या शिबीरात नंबरचे चष्मे अल्पदरात उपलब्ध करुन देण्यात आले होते. शिबीरार्थी गरजू रुणांवर डोळ्याच्या शस्त्रक्रिया अल्प दरात केल्या जाणार आहेत.