संभाजी महाराजांचा लढा व बलिदान युवकांना स्फुर्ती आणि प्रेरणा देणारा -प्रा. माणिक विधाते
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयात स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर थोपटे, उपप्राचार्य नासीर सय्यद, कला शाखा विभाग प्रमुख प्रा. रामदास बर्वे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. संभाजी कातोरे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. गणेश विधाटे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. संजय मेस्त्री, ज्युनियर कॉलेजचे विभाग प्रमुख प्रा. सतिश शिर्के, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, सरचिटणीस गणेश बोरुडे, उपाध्यक्ष निलेश इंगळे, अनिकेत पाटील, प्रा.सौ. अनिता कराळे, प्रा.जे. एस. देशमुख, प्रा.बी. व्ही. गावखरे, प्रा. ए.व्ही. जाधव, कार्यालयाचे प्रमुख डी. के. माने, वाणिज्य शाखेच्या प्रा. शुभांगी ठुबे आदींसह महाविद्यालयीन विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक पराक्रम गाजवून मोठे यश मिळवले. शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराज यांचा जीवन देखील त्यांच्या वडिलांसारखा संघर्षमय राहिला. त्यांनी आदर्श पध्दतीने राज्य चालवले. त्यांच्यावर देखील राजमाता जिजाऊंचे संस्कार झाले होते. वयाच्या चौदाव्या वर्षी बुध्दभूषण राजनीती हा सुंदर ग्रंथ त्यांनी लिहिला. अत्यंत कमी वयात त्यांनी शत्रूंशी लढा देऊन आपले साम्राज्य वाढविले. त्यांनी दिलेला लढा व बलिदान आजच्या युवकांना स्फुर्ती आणि प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.