शिवाजी महाराजांचे विचार आणि स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी घेण्यात आली होती स्पर्धा
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धेस जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसह युवक-युवतींचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला.
शिवाजी महाराजांचे कार्य व विचार आणि स्वच्छतेचे महत्त्व शालेय विद्यार्थी व युवकांमध्ये रुजविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, धार्मिक एकतेचे प्रतिक शिवाजी महाराज, निरोगी आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व, संत गाडगेबाबा यांचे जीवनकार्य या विषयावर निंबध लिहिले. तर शिवाजी महारांचे गड-किल्ले, शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्वच्छ सुंदर गाव, निसर्गाच्या सानिध्यातील गाव या विषयावर सुंदर चित्रे रेखाटली.
दोन्ही स्पर्धा तीन गटात झाली. निबंध स्पर्धा लहान गटात (इयत्ता 5 वी ते 7 वी) प्रथम- समृध्दी नितीन घुंगार्डे (चास), द्वितीय- वसुंधरा दिपक पवार (नगर शहर), तृतीय- गौरी गोरक्षनाथ निमसे (चास), उत्तेजनार्थ- प्रज्ञा सुभाष कार्ले (चास), मोठा गट (इयत्ता 8 वी ते 10 वी) प्रथम- भक्ती बाळासाहेब शेलार (चास), द्वितीय- उत्कर्ष नितीनकुमार शेटीया (केडगाव), तृतीय- साक्षी तबाजी कार्ले (चास), उत्तेजनार्थ- स्नेहल प्रकाश जाधव (निमगाव वाघा), महाविद्यालयीन गट प्रथम- उन्नती नितीनकुमार शेटीया (केडगाव), द्वितीय- सोनल गणेश तरटे (सावेडी, नगर) तसेच चित्रकला स्पर्धा लहान गटात (इयत्ता 5 वी ते 7 वी) प्रथम- सोम्या सचिन जाधव (टाकळी काझी), द्वितीय- आदित्य राजेंद्र पटारे (चास), तृतीय- वेदांत शरद बिडवे (संगमनेर), उत्तेजनार्थ- आदिती संदीप गायकवाड (संगमनेर), मोठा गट (इयत्ता 8 वी ते 10 वी) प्रथम- उत्कर्ष नितीनकुमार शेटीया (केडगाव), द्वितीय- यश मंगेश तांबे (संगमनेर), तृतीय- आएशा मोहसीन शेख (पानोडी, संगमनेर), उत्तेजनार्थ- दर्शन संतोष म्हसे (पानोडी, संगमनेर), महाविद्यालयीन गट प्रथम- उन्नती नितीनकुमार शेटीया (केडगाव), द्वितीय-सोनल गणेश तरटे (सावेडी, नगर) यांनी बक्षिसे पटकाविली. निबंध स्पर्धेचे परीक्षण प्रा. रंगनाथ सुंबे व चित्रकला स्पर्धेचे परीक्षण कला शिक्षक उत्तम कांडेकर यांनी केले.
विजेत्या स्पर्धकांना संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, सचिव मंदाताई डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे यांनी शुभेच्छा दिल्या. या विजेत्या स्पर्धकांना लवकरच मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण केले जाणार आहे. या स्पर्धेसाठी नेहरु युवा केंद्राचे मार्गदर्शन लाभले.