भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना आपले गुरू मानले अशा महान व्यक्तिमत्वाचा आदर्श अंगीकारावा – शिवाजी साळवे
अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब तेलोरे, राज्य संघटक नंदकुमारजी गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष अभिजीत खरात, महिला जिल्हाध्यक्षा मीनाताई गायकवाड, वैशाली गायकवाड, दर्शन गायकवाड, धनश्री गायकवाड आदी उपस्थित होते.
शिवाजी साळवे म्हणाले की, महात्मा फुले यांनी समतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी केली. समाजात समता आणि रुढी, परंपरा दूर होण्यासाठी त्यांनी शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. बहुजनांच्या राजेचा इतिहास समाजा समोर आनण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. कुटुंबाचा उद्धार पुरूषांपेक्षा महिला करू शकतात, हा दूरदृष्टीकोन ठेऊन त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडी करुन दिली. प्रवाहाविरोधात जाऊन त्यांनी क्रांती घडवली. अशा महान व्यक्तीमत्वाचे कार्य जयंती दिनापुरते मर्यादीत न ठेवता त्यांचे विचार आयुष्यभर अमलात आनल्यास खर्या अर्थाने क्रांती सूर्यास अभिवादन ठरेल.