तारकपूरला गरजूंना फुड पॅकेटसह फळांचे वाटप
तरुण वासन यांच्या वाढदिवसाचा सामाजिक उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून गरजू घटकांना जेवण पुरविणार्या घर घर लंगर सेवेला वासन उद्योग समूहाच्या वतीने एक महिन्याचे अन्नधान्य व किराणाची मदत देण्यात आली. तर लंगर सेवेच्या तारकपूर येथील सेंटरवर गरजूंना फुड पॅकेटसह फळांचे वाटप करण्यात आले.
वासन उद्योग समूहाचे तरुण वासन यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जनक आहुजा, प्रीतपालसिंह धुप्पड, हरजितसिंह वधवा, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, राजेंद्र कंत्रोड, गुलशन कंत्रोड, ठाकूर नवलानी, अभिमन्यू नय्यर, कैलास नवलानी, राजबीरसिंह संधू, सनी वधवा, दलजितसिंह वधवा, मनोज मदान, शरद बेरड, पुरुषोत्तम बेट्टी, अनिश आहुजा, राजू जग्गी, श्याम भिंगारदिवे, कुणाल चोपडा, दामोदर माखिजा आदींसह लंगर सेवेचे सेवादार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरजितसिंह वधवा म्हणाले की, वासन उद्योग समूह व जनक अहुजा परिवाराचा सामाजिक कार्यात नेहमीच योगदान राहिले आहे. घर घर लंगर सेवेला कोरोना काळातही त्यांच्या माध्यमातून मोठी मदत उपलब्ध झाल्याने, अनेक गरजूंना जेवण पुरवता आले असल्याचे त्यांनी सांगितले.
अजिंक्य बोरकर यांनी भुकेलेल्यांना जेवण देणे हे मोठे पुण्याचे काम आहे. घर घर लंगर सेवेने मानवतेच्या भावनेने ही सेवा उभी केली आणि आज देखील ही सेवा अविरत सुरू आहे. या सेवेला वासन परिवारासह इतर दानशूर व्यक्तींचा आर्थिक हातभार लागल्याने अनेक गरजूंना दोन वेळचे जेवण मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.