• Mon. Dec 9th, 2024

क्रांतीदिनी ईव्हीएम मशीन विरोधात जनजागृती

ByMirror

Aug 9, 2022

नो बॅलेट, नो वोटींग विषयकाचे पत्रक वाटप

स्वातंत्र्याची दुसरी लढाई ईव्हीएम विरोधात -जालिंदर चोभे मास्तर

अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांतीदिना निमित्त मंगळवारी (दि.9 ऑगस्ट) इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम जनआंदोलनाच्या वतीने शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल येथील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यासमोर नो बॅलेट, नो वोटींग विषयकाचे जनजागृतीवर जालिंदर चोभे मास्तर यांनी पत्रकांचे वाटप केले. देशात मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या या मागणीसाठी ईव्हीएम चले जावची घोषणा देण्यात आली.


जालिंदर चोभे म्हणाले की, भाजपाई लबाडांच्या हाती केंद्रीय सत्ता आली आणि लोकशाही पायदळी तुडवीत अघोषित आणीबाणी देशात निर्माण झाली आहे. बहुजनांना गुलाम करण्यासाठी जाती, धर्माच्या नावाखाली लढवले जात आहे. सत्ताधार्‍यांनी देशाची आर्थिक स्थिती डामाडोल केली असून, शिक्षण व्यवस्था मोडीत काढली आहे. बॅलेटविना मते गेली, निवडणूक आयोगाच्या नाकर्तेपणामुळेच भाजपही बेभान झाले आहे. गुजराथ्यांनी देशाची आर्थिक राजधानी मुंबई गुजरातला जोडण्यासाठी मोठे हत्याकांड घडवले. तरीही 1960 साली मुंबई महाराष्ट्रत राहिली. याचा बदला घेण्यासाठी गुजराथी मोदी-शहांनी मुंबईचे अभेद्य कवच शिवसेना फोडून, सरकार पाडले. 2019 च्या निवडणुकीमध्ये 20 लाख ईव्हीएम चोरीसह अनेक घोटाळे उघड झाले. निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टावर भरोसा ठेवून आम्ही गप्प राहिलो. आता तोंडाच बंद करण्यात आले आहे. 2024 पर्यंत हातपाय बांधले जातील, कारण निवडणुकांचे नाटकांचे प्रयोग निवडणूक आयोग करीत आहे. सुप्रीम कोर्ट प्रेक्षकांच्या भूमिकेत असून, स्वातंत्र्याची दुसरी लढाई ईव्हीएम विरोधात असून, सर्वसामान्यांना लढा द्यावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.


तर 2024 मध्ये लोकसभेची निवडणुक ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर होण्यासाठी देशातील ग्रामपंचायतीन ईव्हीएम विरोधात ठराव करून जिल्हाधिकारी, निवडणूक आयोगाला पाठवून चेतावणी द्यावी. नो बॅलेट, नो वोटिंग असा ठराव पास केला तर ग्रामसभेच्या ठरवला पार्लमेंटच्या ठरावा सारखेच अभेद्य कवच राहणार आहे. ईव्हीएमद्वारे मतांची हेराफेरी खुले सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास श्रीलंकेसारखी स्थिती आपल्या देशाची होणार आहे. राजकीय पक्ष व नेते सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्सचे छापे यामुळे ईव्हीएम विरोधात सक्रिय भूमिका घेत नाहीत. मात्र ईव्हीएम विरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन केल्यास पुन्हा लोकशाही असतित्वात येणार असल्याचे त्यांनी चोभे मास्तर यांनी स्पष्ट केले.


सर्व राजकीय पक्षांनी आपल्या भूमिका व मतभेद बाजूला ठेवून निवडणूक आयोगाला घेरुन ईव्हीएम विरोधात आवाज उठवावा, यामध्ये सर्वसामान्य जनता देखील रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या नो बॅलेट, नो वोटींग मोहिमेच्या जनजागृतीसाठी गोरख जाधव, अस्लम शेख, डॅनीयल तिजोरे, सुनिल मिरपगार, सुनिल कदम, दिपक भिंगारदिवे, महादेव काळे, विवेक पटेकर, सोमनाथ शिंदे, हरिदास खोरे प्रयत्नशील आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *