डीजेच्या दणदणाटात युवकांचा उत्साह शिगेला
अहमदनगर (प्रतिनिधी)- दोन वर्षापासून कोरोनाचे सावट असल्याने शिवजयंती उत्साहात साजरी करता आली नाही. यावर्षी काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. मात्र जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशान्वये अधिक प्रमाणात एकत्र येण्याचे व मिरवणूक न काढण्याचे निर्बंध झुगारुन युवकांनी डीजेच्या दणदणाटात शहरातून मिरवणूक काढली. हातात भगवे ध्वज, शिवाजी महाराजांचा जयजयकार करत युवकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. बंदोबस्तासाठी पोलिसांचाही फौजफाटा उपस्थित होता. काही चौकाचौकात डीजे लावण्यात आले होते. यामध्ये युवकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला. तर नागरिकांनी देखील मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती.