दोन वर्षापासून कोरोनाने बंद पडलेल्या कुस्ती खेळाला गावांच्या यात्रा उत्सवामुळे चालना -मनिष ठुबे
अहमदनगर (प्रतिनिधी)- वडगाव गुप्ता (ता. नगर) येथील गावाच्या यात्रेनिमित्त झालेल्या दावल मलिक केसरी कुस्ती स्पर्धेत पै. मनोहर (अप्पा) कर्डिले याने कुस्ती चितपट करुन मानाची चांदीची गदा पटकाविल्याबद्दल केडगाव येथे त्यांचा आर.एम.टी. फिटनेस क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योजक मनिष ठुबे, उत्तर महाराष्ट्र केसरी युवराज करंजुले, वस्ताद सोमनाथ राऊत, सुनिल ठुबे, आनंद शिंदे, निलेश मदने, राजू निमसे, मेजर रवी ठाणगे, विजय निमसे, पंढरीनाथ ठाणगे, ओमप्रकाश थोरात, पै. राहुल गाढवे आदी उपस्थित होते.
उद्योजक मनिष ठुबे म्हणाले की, कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून बंद पडलेल्या कुस्ती खेळाला गावांच्या यात्रा उत्सवामुळे चालना मिळाली आहे. शहरातील मल्लांना कुस्तीचा मोठा वारसा असून, हा वारसा युवा मल्ल पुढे चालवित आहे. सदृढ व निरोगी आरोग्यासाठी व्यायाम महत्त्वाचा असून, युवकांनी व्यायामाकडे वळण्याचे त्यांनी आवाहन केले.