कथित आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर येथील नाशिक धर्म प्रांताचे बिशप रा. रेव्ह.शरद गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे अमरण उपोषण चालू करण्यात आले यावेळी रेव्ह. सतीश तोरणे, रेव्ह. येशुदास पंडित, रेव्ह. डिकन समीर गायकवाड आदीसह समाज बांधव उपस्थित होते. बिशप शरद गायकवाड हे नाशिक धर्म प्रांताचे महाधर्मगुरु आहेत अहमदनगर नाशिक या कार्यक्षेत्रात एकूण 74 चर्च असून या सर्व चर्चचा प्रशासकीय आणि धार्मिक कामकाज ते पहात आहेत नाशिक येथील रुपेश निकाळजे या व्यक्तीने बिशप शरद गायकवाड यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले आहे या आरोपाला कोणतेही तथ्य नसून हे फक्त कथित आरोप करण्यात आले आहेत बिशप गायकवाड यांची कामाची पद्धत व धडाडीने निर्णय घेण्याच्या पद्धतीमुळे ते समाजात लोकप्रिय आहेत त्यांच्यावर केलेले हे कथित भ्रष्टाचाराचे आरोप आहेत तसेच बिशप शरद गायकवाड यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून धर्म प्रांतातील अनेक धर्मगुरूंनी उपोषणात सहभागी होण्याची तयारी दर्शविलेली आहे तसेच अनेक सामाजिक संघटनानि उपोषणास पाठींबा दिला आहे, कथित भ्रष्टाचाराचा आरोप करणारे नाशिक येथील रुपेश निकाळजे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले आहे.