अहमदनगर(प्रतिनिधी)- महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 अंतिम निकालाची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, यामध्ये अहमदनगरचा महेश शिवाजी हरिश्चंद्रे राज्यात नऊवा तर ओबीसी विभागात दुसरा आला आहे.
पाटबंधारे विभागातील कर्मचारी शिवाजी हरिश्चंद्रे यांचा तो मुलगा आहे. महेश ने विळद घाट येथील विखे पाटील महाविद्यालयात बीए मेकॅनिकल इंजिनिअरीगचे शिक्षण पुर्ण करुन स्पर्धा परीक्षेची तयारी केली होती. राज्यसेवा मुख्य परीक्षेत त्याने उत्तमपणे यश संपादन केले. जलसंपदा विभागाचे जी.बी. नान्नोर व महाराष्ट्र राज्य बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले असून, हरिश्चंद्रे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.