गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा नृत्यविद्यालय सुरु करावे -प्रा. सुभाष गडाख
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या लावणीला मोठ्या उंचीवर पोचवण्याचे काम नामचंद पवळा भालेराव यांनी केले. ज्यांच्या कला क्षेत्रातील धाडसी प्रवेशामुळेे महिलांना कलेची द्वारे खुली झाली. अशा महान कलेच्या सम्राज्ञी आद्यनृत्यांणा नामचंद पवळा भालेराव हिवरगांवकर यांच्या स्मृतीचे जतन करण्यासाठी त्यांच्या नावे नृत्यविद्यालय सुरु केल्यास अनेक कलाकार घडतील, असा विश्वास सरपंच प्रा. सुभाष गडाख यांनी व्यक्त केला.
आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव यांची 152 वी जयंती कला सम्राज्ञी पवळा कलामंचच्या वतीने सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. गरजू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रा. गडाख बोलत होते. प्रारंभी आद्यनृत्यांगणा पवळा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते यादवराव पावसे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, वृक्षमित्र प्रा. गणपत पावसे, अशोक भालेराव, डॉ. प्रमोद पावसे, रामनाथ गडाख, संस्थेचे सचिव नितीनचंद्र भालेराव, भीमा पावसे, बौध्दचार्य रामदास भालेराव, रंजना भालेराव, सचिन भालेराव, बाळासाहेब भालेराव आदींसह शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
काशिनाथ पावसे यांनी आद्यनृत्यांणा नामचंद पवळा भालेराव यांच्या हिवरगांव पावसा येथील स्मारकाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागाकडे वर्ग केला आहे. परंतु दीर्घकाळापासून सदरचा प्रस्ताव प्रलंबित असून, नामचंद पवळा यांच्या राष्ट्रीय स्मारकास महाराष्ट्र शासनाने तात्काळ निधी देण्याची मागणी त्यांनी केली.
प्रा. वृक्षमित्र गणपत पावसे, म्हणाले की, नामचंद पवळा या स्टेजवर प्रथम नृत्य करणार्या महिला होत्या. ज्या काळात स्त्रिया कलाक्षेत्रात स्टेजवर नृत्य करत नव्हत्या. अशा काळात नामचंद पवळा यांनी धाडसाने नृत्य सादर केले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने पवळा तबाजी भालेराव हिवरगांवकर यांच्या नावाने राज्य सांस्कृतिक पुरस्कारांतर्गत तमाशा लोककला पुरस्कार देणाचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करत. त्यांच्या स्मारकासाठी सर्व कलाप्रेमींनी निर्णायक लढा देण्याचे आवाहन केले. यादवराव पावसे यांनी कला क्षेत्रातील योगदानाबद्दल नामचंद पवळा यांचे समाज कायम ऋणी राहील. त्यांच्या स्मृती जतन करण्याचे काम कला सम्राज्ञी पवळा कलामंचच्या माध्यमातून सुरु आहे. नामचंद पवळा त्यांच्या राष्ट्रीय स्मारकास निधी मिळवून देण्यासाठी सरपंच सेवा संघ व कला मंच प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना कला सम्राज्ञी पवळा कलामंच, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज विचार मंच हिवरगाव पावसा यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीनचंद्र भालेराव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिजीत भालेराव, सुयोग भालेराव, राजू दारोळे, बाबासाहेब कदम, रोहिणी भालेराव, पल्लवी भालेराव, विकास दारोळे, रोहित भालेराव, यश बोर्हाडे, चेतन भालेराव यांनी परिश्रम घेतले.