महानुभाव पंथाचे श्रध्दास्थान असलेल्या आत्मतिर्थ पंचाळेश्वरच्या दर्शनासाठी भाविक रवाना
भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने घेतलेला पुढाकार अभिनंदनीय -प्रा. माणिक विधाते
अहमदनगर (प्रतिनिधी)- महानुभाव पंथाचे श्रध्दास्थान असलेल्या आत्मतिर्थ पंचाळेश्वर येथे अमावस्येला दर्शनाला जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या अहमदनगर ते पंचाळेश्वर विशेष बस सेवेचा प्रारंभ गुरुवारी (दि.28 जुलै) राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते झाला.
या बस सेवेसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या विशेष प्रयत्नाने अहमदनगर उपदेशी संघ व सर्वज्ञ युवा सेवाभावी संस्था व राम एजन्सीच्या यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आली. ही बस सेवा सुरु होण्यासाठी तारकपुरचे आगार व्यवस्थापक अभिजीत आघाव यांचे सहकार्य लाभले असून, दर महिन्याच्या अमावस्येला ही विशेष बस सोडण्यात येणार आहे.
या बस सेवेच्या उद्घाटनप्रसंगी वाहतुक नियंत्रक, वाहक जयदेव हेंद्रे, चालक अशोक अळकुटे, राम एजन्सीचे विष्णु मेघानी, मोनेश मेघानी, सर्वज्ञ युवा सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ धोंडे, विजय शिंदे, दादासाहेब दळवी, दत्ताभाऊ पवार, दादासाहेब विधाते, निखील खामकर, सुरेखा ठोकळ, भारती जाधव, सुरंगा विधाते, अलका विधाटे, मनिषा विधाते आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, आत्मतिर्थ पंचाळेश्वर येथे दर अमावस्या व पौर्णिमेला महानुभाव पंथाचे भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला जात असतात. भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने घेतलेला पुढाकार अभिनंदनीय असून, ही सेवा प्रत्येक महिन्याच्या अमावस्या व पौर्णिमेला सुरु ठेवण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.