आमदार लंके यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
शैक्षणिक क्षेत्रातील कार्यासाठी नेहमीच पाठबळ राहणार -आ. निलेश लंके
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा पालक संघाच्या उपाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची निवड करण्यात आली. आमदार निलेश लंके यांच्या हस्ते डोंगरे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी पालक संघाचे सचिव असगर पटवेकर, माजी सरपंच साहेबराव बोडखे, पालक संघाच्या अध्यक्षा कांता लोखंडे, आदीनाथ गायकवाड, आमदार लंके यांचे स्वियसहाय्यक शिवा कराळे आदी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्हा पालक संघ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी व शिक्षकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करत आहे. उपक्रमशील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांचा संघाच्या वतीने पुरस्काराने सन्मानित करण्यात येते शिक्षक दिनी शिक्षकांचा गौरव गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आदी उपक्रम राबविण्यात येतात. डोंगरे यांचे सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पालक संघाचे सचिव असगर पटवेकर यांनी सांगितले.
आमदार निलेश लंके यांनी सर्वच क्षेत्रात पै. नाना डोंगरे यांचे सुरु असलेले सामाजिक कार्य प्रेरणादायी आहे. त्यांची अहमदनगर जिल्हा पालक संघाच्या उपाध्यक्षपदी झालेली निवड अभिनंदनीय असून, त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्यासाठी नेहमीच पाठबळ राहणार असल्याचे सांगितले. पै. नाना डोंगरे यांनी पालक, शिक्षक व विद्यार्थी हे शिक्षण क्षेत्रातील एक घटक असून, त्यांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. या निवडीबद्दल डोंगरे यांच सर्वत्र अभिनंदन होत आहे.