• Thu. Dec 12th, 2024

अहमदनगरमध्ये रविवारी रंगणार पॅराग्लायडिंग महोत्सव

ByMirror

Feb 11, 2022

पॅराग्लायडिंग पाहण्यासाठी नगरकरांना येण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर पॅराग्लायडिंग फ्लायर्स व आर्मी पायलट्स यांच्या संयुक्तविद्यमाने पॅराग्लायडिंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पॅराग्लायडिंग फ्लायर्स व आर्मी पायलट्स यांच्यात सराव व मैत्रीपूर्ण स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही पॅराग्लायडिंग स्पर्धा रविवार दि. 13 फेब्रुवारी रोजी शहराजवळील मिरावली पहाड, देवगावचे डोंगर (अगडगाव घाट), इमामपूर घाटा जवळील उजवीकडील डोंगर यापैकी एका ठिकाणी हवेच्या दिशेनूसार दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजता होणार असल्याची माहिती नगर पॅराग्लायडिंग फ्लायर्सचे पॅराग्लायडिंग पायलट प्रसाद खटावकर व विजय सुलाखे यांनी दिली.
या स्पर्धेचे परीक्षण निवृत्त कर्नल एस. आर. निकम करणार आहेत. पॅराग्लायडिंग महोत्सवाच्या माध्यमातून सर्वसामान्यांमध्ये या खेळाची आवड निर्माण होणे, अहमदनगर जिल्ह्याला पॅराग्लायडिंगच्या दृष्टीकोनाने खेळाचे ठिकाण बनवून नकाशावर आणणे आणि पॅराग्लायडिंग करणार्‍या स्थानिक युवकांना रोजगार व पर्यटनाला चालना देण्यासाठी या साहसी खेळाचा प्रचार-प्रसार करण्याचा मुख्य उद्देश आहे. हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुला असून, पॅराग्लायडिंग पाहण्यासाठी येऊ इच्छिणार्यांनी आयोजकांशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व अपूर्वा मो.नं. 9822243395, सावंत 9822211486, मराठे 9922998507 यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *