• Wed. Oct 15th, 2025

रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग यूथ क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

ByMirror

Jul 27, 2023

नगरच्या शिलू मकर अध्यक्षपदी तर मुंबईच्या आरती कथारिया-म्हात्रे सचिवपदी

कार्यक्रमात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय रोटरीच्या पदाधिकाऱ्यांचा ऑनलाईन सहभाग

अहमदनगर (प्रतिनिधी)- युवक-युवतींच्या विविध प्रश्‍नांवर कार्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग यूथचा दुसऱ्या वर्षीचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. नगरच्या शिलू मकर यांनी अध्यक्षपदाची तर मुंबईच्या आरती कथारिया-म्हात्रे यांनी सचिवपदाची सूत्रे स्विकारली. या कार्यक्रमात राज्य व परदेशातील सदस्य ऑनलाईन पध्दतीने सहभागी झाले होते. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 अंतर्गत हा क्लब युवकांच्या विविध प्रश्‍नांवर कार्य करणार आहे.


या पदग्रहण सोहळ्यासाठी रोटरीचे जिल्हा 3132 चे उपप्रांतपाल क्षितीज झावरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. क्लबच्या मावळत्या अध्यक्षा नंदिनी जग्गी यांनी शिलू मकर यांच्याकडे तर मावळत्या सचिव सविता चढ्ढा यांनी आरती म्हात्रे यांच्याकडे आपल्या पदाची सूत्रे सोपवली.


नूतन अध्यक्षा शिलू मकर यांनी नवीन वर्षात रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग यूथ क्लबच्या माध्यमातून रोटरी प्रांतपाल स्वाती हेरकल यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण, साक्षरता, कौशल्य विकास, मानसिक स्वास्थ्य, आरोग्य, आर्थिक विकास, पाणी व सार्वजनिक स्वच्छतेवर उपक्रम राबविणार असल्याचे स्पष्ट केले. तर युवकांमध्ये शांती, प्रेम व आशा निर्माण करणारे अनेक परिवर्तन प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.


यावेळी क्लब ट्रेनर डॉ. बिंदू शिरसाठ, जागृती ओबेरॉय, संगीता चंद्रन, स्वीटी पंजाबी, अमेरिकेच्या हर्षिता तपारीया, कॅनडाच्या नेत्रा प्रभू, नितेश म्हात्रे आदींनी ऑनलाइन बैठकीत सहभाग नोंदविला. यावेळी मनीष बोरा व सुशिला मोडक यांना क्लबचे मानद सदस्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.


क्लबच्या वतीने जानकीबाई आपटे मुक बधीर विद्यालयाच्या रोटरी आंतरराष्ट्रीय नवीन इंटरॅक्ट क्लबला चार्टर सुपूर्द करण्यात आला. इंटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष मनीष गांधी, सचिव साईनाथ दुधाळे, सहकारी शिक्षिका अर्चना देशमुख, पूनम गायकवाड यांनी डिस्ट्रिक्ट युथ सर्व्हिस डायरेक्टर इश्‍वर बोरा यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्विकारले.


पदग्रहण सोहळ्यानिमित्त नूतन सचिव आरती म्हात्रे यांच्या परिवाराकडून नवीन ई लर्निंगसाठी स्मार्ट टीव्ही व सुशिला मोडक यांच्या परिवाराकडून शैक्षणिक साहित्य तारकपूर येथील सेंट मोनिका प्राथमिक शाळेला डिस्ट्रिक्ट डायरेक्टर लिटरेसी दादासाहेब करंजुले यांच्या हस्ते भेट देण्यात आले. या शैक्षणिक साधनांनी गरजू घटकातील विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून प्रगती साधता येणार आहे. रुही मकर यांनी सूत्रसंचालन केले. आभार आरती म्हात्रे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *