प्रा. विधाते यांनी युवकांसह सर्व समाज घटकांना जोडण्याचे काम केले -मारुती पवार
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी प्रा. माणिक विधाते यांची नियुक्ती झाल्याबद्दल भिंगार शहरात त्यांचा राष्ट्रवादीचे सरचिटणीस मारुती पवार यांनी सत्कार केला. यावेळी आमदार संग्राम जगताप, नगरसेवक प्रकाश भागानगरे, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, ओबीसी सेलचे अमित खामकर, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, साधना बोरुडे, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, उमेश धोंडे, वकिल सेलचे ॲड. योगेश नेमाणे, अमोल कांडेकर, डॉक्टर सेलचे डॉ. रणजीत सत्रे, संतोष हजारे, शिवम भंडारी, सोमनाथ शिंदे, निलेश इंगळे, लहू कराळे, शुभम पुंड, माजी प्राचार्य कैलास मोहिते, विशाल बेलपवार, राहुल जाधव, इंजि. औटी, सागर गुंजाळ आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मारुती पवार म्हणाले की, पक्षात कार्य करताना प्रा. विधाते यांनी युवकांसह सर्व समाज घटकांना जोडण्याचे काम केले आहे. राजकारणात येणाऱ्या नवीन युवकांना दिशा देण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला शिस्त लावून सामाजिक कार्य करण्याची ऊर्जा दिली. त्यांच्या माध्यमातून शहरातील सुशिक्षित वर्ग पक्षाला जोडला गेला आहे. तर युवकांना त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना प्रा. विधाते यांनी आमदार संग्राम जगताप व आमदार अरुण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे कार्य जोमाने सुरु आहे. विकासात्मक राजकारण करताना सर्वांना बरोबर घेऊन सर्वांना संधी देण्याचे कार्य सुरु असल्याचे स्पष्ट केले. तर नव्या जोमाने कामाला लागण्याचे कार्यकर्त्यांनी त्यांनी आवाहन केले.