श्री शाहू विद्यामंदिर खडांबे विद्यालयात राजर्षी शाहू महाराज पुतळा सुशोभीकरणाचे उद्घाटन
सेवापूर्तीनिमित्त पुष्पा चौधरी यांचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रेरणा व विचाराने मागील शंभरवर्षापासून योगदान देत आहे. बहुजन समाजाला शिक्षणाने विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम संस्थेने केले. संस्थेच्या शंभर वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक शेतकरी व बहुजन समाजातील विद्यार्थी घडले असून, समाजाला एक विकासात्मक दिशा मिळाल्याचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील यांनी केले.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री शाहू विद्यामंदिर खडांबे विद्यालयात राजर्षी शाहू महाराज पुतळा सुशोभीकरणाच्या उद्घाटनाप्रसंगी झावरे पाटील बोलत होते. तर यावेळी शिक्षिका पुष्पा चौधरी यांच्या सेवापुर्तीनिमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला. श्री शाहू विद्यामंदिर खडांबेे (ता. राहुरी) विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष रा.ह. दरे, सेक्रेटरी जी.डी. खानदेशी, सहसचिव अॅड. विश्वासराव आठरे, विश्वस्त मुकेश मुळे, जयंत वाघ, दीपक दरे, शिवाजी खिलारी, कृषीभूषण सुरशिंग पवार, अॅड. सुभाष पाटील, माजी उपसभापती बाळासाहेब लटके, राष्ट्रवादीचे राहुरी तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, नानासाहेब पवार, भानुदास कल्हापूरे, किशोर हरिश्चंद्रे, प्रभाकर हरिश्चंद्रे, भाऊसाहेब आवारे, आबासाहेब वाघमारे, विद्यालयाचे मुख्याध्यापक शहाजी देशमाने, पर्यवेक्षक जयसिंग नरवडे, शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
जी.डी. खानदेशी यांनी राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा त्यांच्या विचारांची प्रेरणा देणार आहे. शिक्षणाने समाज व्यवस्था बदलण्याचे त्यांचे स्वप्न साकारले गेले असल्याची भावना व्यक्त करुन त्यांनी विद्यालयाच्या सर्वांगीन प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. अॅड. विश्वासराव आठरे यांनी शहरात शिक्षण देत असताना ग्रामीण भागातही संस्थेने शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचवली. जिल्ह्याच्या विकासात्मक वाटचालीत संस्थेने भरीव योगदान राहिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इतरही मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करुन सेवानिवृत्त झालेल्या शिक्षिका पुष्पा चौधरी यांच्या कार्याचे कौतुक करुन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश रामफळे यांनी केले. आभार राहुल जाधव यांनी मांनले.