• Thu. Jan 22nd, 2026

भिंगारच्या जॉगिंग पार्क मधील सोयी-सुविधांसाठी ब्रिगेडियर डिसूजा यांना निवेदन

ByMirror

Aug 15, 2023

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

जॉगिंग पार्क रौप्य महोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावर असताना विविध सुविधा देण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने व फिरण्यासाठी पंचवीस वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कचे रौप्य महोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावर असताना या उद्यानात सोयी-सुविधा पुरविण्याची मागणी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने छावणी परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडियर रसोल डिसूजा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.


हरदिनच्या शिष्टमंडळाने ब्रिगेडियर डिसूजा यांची भेट घेऊन जॉगिंग पार्कचे प्रश्‍न मांडले. डिसूजा यांनी सदर प्रश्‍न सोडविण्याचे शिष्टमंडळास आश्‍वासन दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, स्वच्छता निरीक्षक रमेश साके, गणेश भोर, इंजिनिअर महेंद्र सोनवणे, अशोक फुलसौंदर, हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, मुन्ना वाघस्कर, अभिजीत सपकाळ, मेजर दिलीप ठोकळ, रमेश वराडे, सर्वेश सपकाळ, दीपक बडदे, जालिंदर बोरुडे, मनोहर दरवडे, दीपक घाडगे, एकनाथ जगताप, दिलीप गुगळे, मच्छिंद्र बेरड, तुषार धाडगे, संतोष हजारे, विकास निमसे, अर्जुन बेरड, सिताराम परदेशी, अशोक पराते, किशोर भगवाने, रामनाथ गर्जे, चुनीलाल झंवर, दीपक घोडके, विठ्ठल राहिंज, अरुण रोकडे, बापूसाहेब तांबे, अविनाश जाधव, संतोष लुनिया, आसाराम बनसोडे, संतोष रासकर, रमेश कोठारी, विनीत राठोड, शिवकुमार पांचारिया, रतन मेहत्रे, नागेश खुरपे, अशोक भगवाने, भगवान दळवी, शशिकांत बोरुडे, दादासाहेब नवले, अमोल सकपाळ, भाऊसाहेब गुंजाळ, पांडुरंग आटकर, विशाल भामरे, गोरख पुंड, राधेलाल नकवाल, संदीप शिंगवी, सागर काबरा, प्रवीण परदेशी, सीए रवींद्र कटारिया, ॲड. सुभाष काकडे, डॉ. नानासाहेब अकोलकर, किशोर कटोरे, सुमित राठोड, सौरव रासने, गणेश माळगे आदी उपस्थित होते.
21 ऑगस्ट 1998 रोजी लोकार्पण झालेल्या भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कला 21 ऑगस्ट रोजी 25 वर्ष पूर्ण होत असताना या दिवशी जॉगिंग पार्क मध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती संजय सपकाळ यांनी दिली. तर ब्रिगेडियर डिसूजा यांना सदर कार्यक्रमाचे आमंत्रण देवून जॉगिंग पार्क मधील विविध प्रश्‍न त्यांनी सविस्तर मांडून चर्चा केली.


मागील 25 वर्षापासून हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्यांसह नागरिक जॉगिंग पार्क मध्ये सकाळ, संध्याकाळ फिरण्यास येतात. आरोग्याच्या दृष्टीकोनाने आलेले नागरिक योगा व व्यायाम करत असतात. मात्र दिवसंदिवस या पार्कची दुरावस्था होत आहे. काही सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून, छावणी परिषदेच्या माध्यमातून पार्क मधील प्रश्‍न सोडविण्याची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले.


जॉगिंग ट्रॅकवर मुरूम व लाल माती टाकून त्याची दुरुस्ती करुन लांबी वाढवावी, पार्क मधील बंद पडलेला पाण्याचा कारंजा सुरु करावा, संगितासाठी लावलेल्या साऊंडची व बंद पडलेल्या पथदिव्यांची दुरुस्ती करावी, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करावी, स्वच्छतागृहात लाईट व पाण्याची सोय करावी, ओपन जिम मध्ये काही खेळणी खराब असून ते दुरुस्त करावे, काही भागात कच टाकून ब्लॉक बसवावे, योग व प्राणायामसाठी नागरिकांसाठी ओटा बांधून द्यावा व उद्यानाच्या देखरेखसाठी कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *