• Wed. Feb 5th, 2025

पहिल्याच दिवशी शो हाऊसफुल

ByMirror

Feb 11, 2022

जिंदगानी’ चित्रपटाचा आ. जगताप यांच्या हस्ते शुभारंभ

अहमदनगर (प्रतिनिधी)-नर्मदा सिनेविजन निर्मित मराठी चित्रपट जिंदगानी या चित्रपटाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, दीपक रोहोकले, संतोष गोमसाळी, शैलेश गोमसाळी आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी व पर्यावरण हा विषय चित्रपटात हाताळण्यात आला असून, पहिल्याच दिवशी सर्व चित्रपटगृहांमध्ये शो हाऊसफुल्ल झाल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, या चित्रपटाचा पहिला शो रिमांड होम व यतिमखाना येथील अनाथ मुलांना दाखवून शुभारंभ करण्यात आला. हा चित्रपट पर्यावरणाचा संदेश देणारा आहे. या चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक विनायक साळवे व निर्माता सुनीता शिंदे, सहनिर्माता सुरज शिंदे यांनी एक सामाजिक संदेश जावा या हेतूने चित्रपटाची निर्मिती केली आहे.  चित्रपटाच्या माध्यमातून पर्यावरणविषयक सामाजिक जागृती घडविण्याचा केलेला प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे. चित्रपटाला महाराष्ट्रभर चांगला प्रतिसाद मिळेल, अशी सदिच्छाही आ. जगताप यांनी व्यक्त केली.

शेतकरीविषयक, पर्यावरणाचा
संदेश देणारा सामाजिक चित्रपट
मराठी चित्रपट जिंदगानीमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, या उद्देशाने सामाजिक संदेश देण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे निराधार विद्यार्थ्यांना चित्रपट दाखवून त्याचा शुभारंभ करण्यात आला असून, यानिमित्ताने निर्माता-दिग्दर्शकांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. चित्रपटात मुख्य कलाकार वैष्णवी मोनी, शशांक शेंडे, विनायक साळवे, सुषमा सिनलकर, प्रथमेश जाधव, सविता हांडे आदींनी भूमिका केली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शेतकरीविषयक तसेच निसर्ग व पर्यावरण याबाबत सामाजिक संदेश देण्यात आला आहे
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *