• Sun. Feb 15th, 2026

नवरात्रनिमित्त गुरुनानक देवजी सेवा ग्रुपच्या वतीने भाविकांना खिचडी

ByMirror

Oct 4, 2022

जी.एन.डी. ग्रुपचे समाजातील कार्य सेवाभावाचे -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त गुरुनानक देवजी सेवा ग्रुपच्या (जी.एन.डी.) वतीने तारकपूर भागात भाविकांना, तर सावेडी येथील मुकबधीर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना व कुष्ठधाम येथील वृध्दांना उपवासाची खिचडी वाटप करण्यात आली.


आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी अमोल गाडे, जनक आहुजा, संजय आहुजा, महेश मध्यान, राकेश गुप्ता, प्रदिप पंजाबी, गिरीश खन्ना, किशोर कंत्रोड, अवतार गुर्ली, सुनिल बजाज, बाबू नवलानी, गुरमीत कथुरिया, विकी कंत्रोड, अनिश आहुजा, गोविंद खुराणा, राज गुलाटी, बाबाजी कर्नलसिंग आदी उपस्थित होते.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, गुरुनानक देवजी सेवा ग्रुप समाजात सेवाभावाने कार्य करत आहे. धार्मिक उपक्रमात नेहमीच ग्रुपच्या वतीने सेवा दिली जाते. कोरोना काळात देखील ग्रुपने सर्व समाजबांधवांना दिलेला आधार कौतुकास्पद आहे.
नवरात्र उत्सवात भाविक व महिला वर्ग मोठ्या संख्येने विविध ठिकाणी दर्शनास जात असतात. उपवासामध्ये देवीच्या दर्शनास जाणार्‍या भाविकांना ग्रुपच्या माध्यमातून खिचडी वाटपचा उपक्रम राबविण्यात आल्याचे जनक आहुजा यांनी सांगितले. मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक गोंधगे यांनी भाविकांसह मुकबधीर विद्यालयात मुलांसाठी हा उपक्रम राबविल्याबद्दल आभार मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *