2022- 23 या आर्थिक वर्षात विविध योजनांचे सर्वाधिक खाते उघडल्याबद्दल पुरस्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर डाक विभागात 2022- 23 या आर्थिक वर्षामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हैदरअली उस्मान मुलानी यांना पुणे डाक क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी पुणे डाक क्षेत्राच्या संचालिका सिमरन कौर, अहमदनगर डाक विभागाच्या वरिष्ठ डाक अधीक्षक श्रीमती जी.हनी उपस्थित होत्या.
अहमदनगर डाक विभागात 2022- 23 या आर्थिक वर्षामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे कर्मचारी व एजंट बांधवांना डिव्हिजनल पुरस्कार प्रदान सोहळ्याचे सीएसआरडी महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुलानी यांना सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
रामचंद्र जायभाये यांनी डाक विभाग सेवक व एजंट यांच्या उत्तम सेवेच्या माध्यमातून वाटचाल करत आहे. ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देऊन प्रभावित करा, त्यांना कार्यालया पर्यंत न आनता त्यांना घरा पर्यंत सेवा पोहचविण्याचे त्यांनी आवाहन केले. सिमरन कौर व जी.हनी यांनी पुरस्कार प्राप्त सर्व सेवक व एजंट यांचे अभिनंदन केले.

हैदर मुलानी मागील 28 वर्षापासून अहमदनगर डाक विभागात एजंट म्हणून काम पाहत आहे. त्यांनी पोस्टाच्या अनेक कल्याणकारी योजना जनते पर्यंत पोहचवून प्रभावीपणे राबविल्या आहेत. मागील आर्थिक वर्षात त्यांनी इन्शुरन्स योजना, मासिक प्राप्ती, टाईम डिपॉझिट, नॅशनल सेविंग सर्टिफिकेट, सुकन्या योजना, पीपीएफ खाते, किसान विकास पत्र आदी विविध योजनांचे सर्वाधिक खाते उघडण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या अगोदर देखील पोस्ट विभागाकडून उत्कृष्ट कार्याबद्दल व सेवानिवृत्त अधिकारी आणि जवानांना गुंतवणूक विषयी मार्गदर्शन केल्याबद्दल मुलानी यांचा आर्मड कोअर सेंटरच्या वतीने सन्मान झाला आहे.