डॉक्टरीपेशा सेवाव्रत म्हणून अंगीकारण्याची गरज -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- गावातील आरोग्य जपण्याचे कार्य करुन कोरोना काळात दिलेल्या योगदानाबद्दल डॉक्टर्स डे निमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथील डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व ग्रामस्थांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
निमगाव वाघा आरोग्य उपकेंद्रातील डॉ. सचिन कळमकर, डॉ. मनोहर गायकवाड तसेच गावातील डॉ. विजय जाधव, डॉ. संदीप जाधव, नवनाथ हारदे, बाळू जाधव यांचा सत्कार डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी केला. यावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, पै. अनिल डोंगरे, सुभाष जाधव, विजय जाधव, भरत बोडखे, पिंटू जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, बळवंत खळदकर, संदेश शिंदे, वाचनालयाच्या उपाध्यक्षा प्रियंका डोंगरे-ठाणगे, शासनाचा आदर्श युवती पुरस्कार प्राप्त मंदाताई डोंगरे आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या भावनेने डॉक्टर आपली सेवा देत असतात. कोरोनाच्या संकटकाळात देवदूत म्हणून डॉक्टर आपली भूमिका पार पाडली. डॉक्टरांचे ऋण न फेडता येणारे आहे. आजही अनेक डॉक्टर सेवाभावाने समाजात कार्य करत आहे. डॉक्टरीपेशा सेवाव्रत म्हणून अंगीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
उपस्थित डॉक्टरांनी सत्काराला उत्तर देताना गावात झालेल्या सत्काराने व मिळालेल्या सन्मानाने भारावलो असल्याचे सांगितले. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.