किर्तनातून आजच्या कौटुंबीक व्यवस्थेवर परखड भाष्य
पाप करून इस्टेट कमवायची मग देह गेल्यावर कमावलं काय?. देहाला सांभाळा -ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर)
अहमदनगर (प्रतिनिधी)- एवढं कोणासाठी जगता? आयुष्यभर पाप करून इस्टेट कमवायची मग देह गेल्यावर कमावलं काय?… त्यामुळे देहाला सांभाळा देह गेल्यावर आपल्याला कोणीच विचारणार नाही. तीन वर्षाच्या मुलाला बापाच्या पिंडाला तेल व्हावे लागते ही दारुमुळे निर्माण झालेली शोकांतिका आहे. दारूमुळे संसार उध्वस्त होत असल्याचे भाष्य करुन, तीव्र शब्दात ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी व्यसनाच्या आहारी जाणार्यांचा समाचार घेतला.

केडगाव उदयनराजेनगर येथे श्री विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या किर्तनात कौटुंबीक व्यवस्थेवर मार्गदर्शन करताना इंदोरीकर महाराज बोलत होते. ह.भ.प. महेश महाराज मडके व प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या या सप्ताहाला प्रमुख पाहुणे म्हणून सुरेखा भानुदास कोतकर उपस्थित होत्या. किर्तनासाठी केडगावसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने हजर होते.
पुढे बोलताना निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी दारुच्या आहारी गेलेल्या कर्ता पुरुषाच्या कुटुंबातील दाहक वास्तवता मांडली. तर दारू पिणार्यांनी, पाजणार्यांनी व सवय लावणार्यांनी भानावर येण्याचे सांगितले. आजच्या कुटुंबव्यवस्थेवर बोलताना आजी आपल्या नातवाला मांडीवर खेळवू शकत नाही. मुली लायकी नसलेल्या मुलांच्या प्रेमात पडून जीवन उध्वस्त करत असल्याचे किर्तनातून त्यांनी परखड मत मांडले.

सप्ताह कमिटीच्या वतीने निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचा गुलाब पुष्प आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते, उद्योजक जालिंदर कोतकर, अशोक कराळे, सचिन सातपुते, भूषण गुंड, धनेश कोठारी, निरज काबरा, मनिष सोमानी, नितीन आजबे, मयूर भोसले, सोनु घेंबुड, मच्छीद्र भांबरे, पप्पू कोकाटे, आंधळे मेजर, दीपक बडे, विकास ऊरमूडे, पप्पू इथापे, पवार सर, संतोष बोरा, भाऊसाहेब कोल्हे, संतोष साळवे, विनय जगदाळे, कैलास भुक्कन, संतोष मोटे, संतोष उरमुडे, शिवा कोतकर, स्वप्निल भागवत, योगेश शिंदे, मांढरे सर, संकेत चौधरी, राजू आंग्रे, योगेश डोंगरे, राहुल जाधव, विशाल सोनटक्के, दादा तारू, सागर भंडारी, रोहित धांडे, कुंडलिक कोल्हे, रवि रासकर, बाबासाहेब दळवी, बाबासाहेब झावरे, पोपट कराळे, गोरख कोतकर, दिगंबर कर्डिले, बापू सांगळे, सुनील लोंढे, पप्पू कार्ले, सोमनाथ सातपुते, नवनाथ कोतकर, उमेश अनारसे, शिवाजी आघाव, मयूर जगदाळे, आकाश वायकर, महेश शिरसाठ, उमेश शिंदे, प्रदिप गर्जे आदींसह केडगाव भजनी मंडळ उपस्थित होते. उपस्थितांचे आभार गणेश सातपुते यांनी मानले.
